प्रथमच कुरुळी गावात सामाजिक भान जपून ऑनलाइन पद्धतीने दशक्रिया विधी प्रवचन संपन्न

प्रथमच कुरुळी गावात सामाजिक भान जपून ऑनलाइन पद्धतीने दशक्रिया विधी प्रवचन संपन्न
Pckhabar-कै. श्री रामचंद्र गजाबा घोरपडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रथमच कुरुळी तालुका शिरूर या गावांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवचन ठेवण्यात आले होते.

दशक्रिया विधीच्या ठिकाणी लोकांची कमी गर्दी व्हावी आणि कोरोना संक्रमणाचा धोका टळून सामाजिक बांधिलकी जपली जावी. कसलही संकट असो पण जेव्हा एखाद्या घरात एखादी व्यक्ती जाते तेव्हा नातेवाईक व जवळची माणसे धोका बाजूला ठेवून दुःखात सहभागी होण्यासाठी जातात. परंतु बरेच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे कोरोणा संक्रमण वाढलेले आहे आणि हे आपल्या कार्यक्रमामुळे होऊ नये व आपल्या प्रतिष्ठेसाठी समाज धोक्यात येऊ नये म्हणून मृत व्यक्तीच्या घरातील लोकांनी व त्यांचे नातू जे आयटी इंजिनिअर आहे. तसेच अनमोल जीवन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहे.  श्रीकांत घोरपडे यांनी ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर केला. व आधीच नातेवाईकांना ग्रामस्थांना मेसेज केला की दशक्रियाविधी ला आपण स्वतःच्या घरांमधून श्रद्धांजली वाहिली तरी चालेल. आणि मग प्रवचनकार अविनाश महाराज साळुंखे ही तयार झाले व त्यांनी स्वतःच्या मोबाईल मधून काही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरून प्रवचन सुरू केले. या ऑनलाईन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दशक्रियाविधी च्या ठिकाणी लोकांनी ऐकलं व बऱ्याच जणांनी घरी राहून या प्रवचनाचा लाभ घेतला.

घोरपडे परिवाराने यातून हा संदेश दिला की स्वतःचा स्वार्थ व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सामाजिक भान जपून अशाप्रकारे कार्य केले पाहिजे. ज्यातून सर्वांचे हित व्हावे व सामाजिक बांधिलकी जपली जावी आणि हीच कार्यरुपी श्रद्धांजली त्यांनी मृतात्म्याला वाहिली.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)