पवारांच्या घरी आकर्षक फुलांच्या सजावटीत विराजमान झाला लालबागचा राजा

ही बातमी शेअर करा.

पवारांच्या घरी आकर्षक फुलांच्या सजावटीत विराजमान झाला लालबागचा राजा
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या नारायण पवार यांच्या घरी आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

फुलांच्या सजावटी सोबतच आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. ही सजावट नारायण पवार आणि सायली पवार यांनी केली आहे. त्यांना वंदना पवार यांनी सहकार्य केले. गेली अनेक वर्ष पवार यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.

पवार यांच्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. गणपतीच्या काळामध्ये घरामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असते, असे नारायण पवार यांनी Pckhabar शी बोलताना सांगितले. या सात दिवसांच्या काळात नारायण पवार, वंदना पवार आणि सायली पवार यांच्याकडून गणपतीची मनोभावे सेवा केली जाते.


ही बातमी शेअर करा.