Pimpri News : कन्या विद्यालयात एस एस सी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थीनींना शुभेच्छा

Pimpri News : कन्या विद्यालयात एस एस सी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थीनींना शुभेच्छा

 

Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज मंगळवार दिनांक 15/03/2022 रोजी एस. एस. सी. परीक्षा मार्च 2022 ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कन्या विद्यालयाचे स्कूल कमिटी चे चेअरमन आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील साहेब यांच्या प्रेरणेने त्यांचे चिरंजीव युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते हृषीकेश वाघेरे पाटील आज विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयात उपस्थित होते . यावेळी विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे व सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .

हृषीकेश वाघेरे यांनी सर्व विद्यार्थिनींनी अतिशय आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाऊन उत्तम यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थिनींना हृषीकेश वाघेरे यांच्यातर्फे परीक्षा लिखाणासाठी पेन चे वाटप हृषीकेश वाघेरे ,मुख्याध्यापिका शारदा शेटे , पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले . यावेळी विद्यालयातील अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यालयाच्या उपशिक्षिका अनघा रांगणेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *