Chinchwad crime news: शेअर बाजारात जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने एकाला 40 लाखांचा चुना
Pckhabar- शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल 40 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी
एका महिलेसह चौघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिया पटेल, प्रकाशभाई, अनिलभाई, अनिल सुतार (सर्व रा. गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजित कृष्णाजी देवळे (वय-57, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी प्रिया पटेल हिने शेअर बाजाराची माहिती दिली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपीला वेळोवेळी 50 लाख दोन हजार रुपये पाठवले. आरोपींनी फक्त 9 लाख 77 हजार 110 रूपये परत केले. उर्वरित 40 लाख 24 हजार 890 रूपये परत न करता फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक जी. डी. माने तपास करत आहेत.















Leave a Reply