Pimpri crime news:भर रस्त्यात मायलेकींचा गुन्हेगारांकडून विनयभंग

Pimpri crime news:भर रस्त्यात मायलेकींचा गुन्हेगारांकडून विनयभंग
Pckhabar-मुलीसह मेडिकलमध्ये जाणार्‍या महिलेचा व मुलीचा भर रस्त्यात दोन सराईत गुन्हेगार भावांनी शिवीगाळ करत विनयभंग करून त्यांच्या पतीला लोखंडी रॉड, बांबुने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री आठ वाजता पिंपरी येथे घडली.

सचिन सुरेश ओंबासे (वय-26), अमर सुरेश ओंबासे (वय-20, दोघे रा. भारत नगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी गुरूवारी रात्री आठ वाजता मेडिकलमध्ये जात होत्या. त्यावेळी पिंपरीतील दत्तमंदिराजवळ  सार्वजनिक रस्त्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत अंगावरील गाऊन फाडला. फिर्यादी यांचे पतीमध्ये आले असता त्यांच्या उजव्या हातावर लोखंडी रॉड, बांबुने मारून जखमी केले. दरम्यान, दोन्ही आरोपी सख्ये भाऊ असून ते सराईत गुन्हेगार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *