Wakad Crime news: तडीपार आरोपीची पोलिसाला धक्काबुक्की
Pckhabar- तडीपारीचा आदेश झुगारत उथळ माथ्याने वावरणार्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसाशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना थेरगाव येथील बापुजी बुवानगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रतिक अंतवान पवार (वय-20, रा. गुरूनानकनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक एन. बी. गेंगजे यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक पवारला पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
या तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी थेरगाव परिसरात आला होता. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या गेंगजे यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की करून शर्ट फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फौजदार गोडे तपास करत आहेत.















Leave a Reply