पोलीस असल्याची बतावणी करून भाजी विक्रेत्याकडील रोकड पळवली
Pckhabar- पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी मिळून एका वाहनाला अडवून भाजी विक्रेत्याकडून 16 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना त्रिवेणीनगर, निगडी येथे घडली.
हरी महादेव शिंदे (वय 31, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे ऑनलाइन भाजी विक्री करतात. भाजी विक्री करत त्यांचा टेम्पो घेऊन त्रिवेणीनगर येथील सार्वजनिक रोडवरून जात होते. तिथे त्यांना एका व्यक्तीने अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून टेम्पोची तपासणी करण्याचा आरोपीने बहाणा केला. त्यानंतर टेम्पोच्या केबिनमध्ये भाजी विक्रीचे 16 हजार रुपये काढून घेत शिंदे यांची फसवणूक केली. पैसे घेऊन आरोपी त्याच्या दुसर्या साथीदारासोबत निघून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करून भाजी विक्रेत्याकडील रोकड पळवली










Leave a Reply