लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Pckhabar- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार  भाटनगर, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथे घडला आहे.  
अल्पेश हनुमंत कांबळे (वय-22, रा. भाटनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पेश याने पीडित अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध ठेवले. तसेच आरोपीने 15 जुलै 2018 पासून 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत विविध ठिकाणी घेऊन जात जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *