दहा रुपये खाली पडल्याचे सांगत पळवला दहा हजारांचा मोबाईल

दहा रुपये खाली पडल्याचे सांगत पळवला दहा हजारांचा मोबाईल
Pckhabar- सफरचंद घेत असलेल्या एकाला दहा रुपये खाली पडल्याचे खोटे सांगून त्याचे लक्ष विचलित करून दोन चोरट्यांनी दहा हजार रुपयांचा मोबईल पळवला. ही घटना रविवारी दुपारी पावणे एक वाजता शिंदे नगर, जुनी सांगवी येथे घडली.
याप्रकरणी बर्कतुल्ला मुबारक खान (वय-52, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान रविवारी दुपारी पावणे एक वाजता शिंदे नगर येथे एका गाड्यावर सफरचंद खरेदी करत होते. त्यावेळी तिथे दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी खान यांना त्यांचे दहा रुपये खाली पडल्याचे खोटे सांगितले. खान दहा रुपये उचलण्यासाठी खाली वाकले असता चोरट्यांनी खान यांच्या खिशातून दहा हजार रुपये किमतीचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *