कोयता बाळगणारा तरूण गजाआड

कोयता बाळगणारा तरूण गजाआड
Pckhabar- कोयता बाळगणार्‍या एका तरूणाला खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नेहरूनगर येथे केली.
हर्षल ऊर्फ गब्बर रामदास पवार (वय-27, रा. नेहरूनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेश नामदेव कौशल्ये यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहर परिसरात शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी हर्षल हा कोयता घेऊन वावरत होता. याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून 200 रूपयांचा एक कोयता जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *