डोंगर कपाऱ्यातील चित्तथरारक पाठलाग करून अट्टल चोरटा जेरबंद

डोंगर कपाऱ्यातील चित्तथरारक पाठलाग करून अट्टल चोरटा जेरबंद

Pckhabar- लोणावळा कुरवंडे गावाच्या डोंगरदऱ्यात तळ ठोकून बसलेल्या अट्टल चोरट्याला चित्तथरारक पाठलाग करून  जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाला यश आले. या चोरट्यावर पुणे शहर हद्दीमध्ये ६० ते ७० घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. 

बिबीशन उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय ४२, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे  अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदाराने बातमी दिली की, खंडाळा येथील एका बंद बंगल्यात चोरी करीत किमती ऐवज लंपास करून एक अट्टल चोरटा नागफणी डोंगरामधील वाघजरीच्या घनदाट जंगलात एका कपारीत लपून बसला आहे. या बातमीच्या आधारे पो.नि.मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव सुरवसे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, मनोज मोरे, अजीज मेस्त्री यांच्या पथकाने पोलीस मित्रांसह शशस्त्र मुसळधार पाऊस पडत असताना दोन तासाची पायपीट करीत चोरट्याची लपून बसण्याची जागा गाठली. पोलीस त्याठिकाणी पोचल्यावर सावध झालेल्या चोरट्याचा चित्तथरारक पाठलाग पोलिसांनी त्याला जेरबंद केले.  

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात संबंधीतावर भादवी कलम ४५४, ४५७, ३८० गुन्हा दाखल असून हा गुन्हा लोणावळा पोलिसांनी उघडकीस आणून ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *