जी एस महानगर बँकेकडून खातेदाराची दहा लाखांची फसवणूक
Pckhabar-भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब बाळासाहेब जासूद (रा. विमाननगर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित कस्तुरे (वय-35, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, चिंचवड), कुमार मुरलीधर नरावडे (वय-53, रा. खडकी, पुणे) यांच्यासह जी एस महानगर सहकारी बँकचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जासुद यांचे भोसरीतील जी. एस. महानगर सहकारी बँकेत खाते आहे. त्यांनी 2016 मध्ये 7 लाख 25 हजारांचा धनादेश (131658) आणि 2 लाख 75 हजारांचा (131659) हे दोन्ही धनादेश त्यांच्या खात्यावर भरले होते. मात्र, आरोपींनी 10 लाखांचे दोन्ही धनादेश त्यांच्या खात्यावर जमा न करता अपहार केला. ही बाब लक्षात येताच जासुद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बँकेच्या मॅनेजरसह आदींविरूध्द तक्रार दिली. फौजदार सावर्डे तपास करत आहेत.
जी एस महानगर बँकेकडून खातेदाराची दहा लाखांची फसवणूक













Leave a Reply