लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
  Pckhabar- लग्नाचे अमिष दाखवून एका 17 वर्षीय मुलीला फिरायला घेऊन जावून तरूणाने जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना नवलाख उंबरे येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम राजेंद्र ढसाळ (वय-21, रा. नवलाख उंबरे, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमने फिर्यादी तरूणीला लग्नाचे अमिष दाखविले. ते जाधववाडी धरण परिसरात वारंवार फिरायला घेऊन गेला. धरणाजवळील बंद खोलीमध्ये  तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. फौजदार जवळगी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *