Bhosari crime news: विवाहितेला धमकावून लैंगिक अत्याचार

ही बातमी शेअर करा.

Bhosari crime news: विवाहितेला धमकावून लैंगिक अत्याचार
Pckhabar- विवाहितेला धमकावून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आपण नवर्‍याला सोडचिठ्ठी देणार असून दुसरे लग्न करणार असल्याचे हमीपत्र लिहून घेतले. ही घटना दोन महिन्यांपूर्वी बोपखेल येथे घडली.
सलमान नूरआलम शेख (वय 30, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये फिर्यादी पिडित महिला आणि आरोपी सलमान याची कामाच्या ठिकाणी ओळख झाली. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळच्या परिसरात राहत होता. त्याने पिडित महिलेशी ओळख वाढविली. ‘तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तू नवर्‍याला सोडचिठ्ठी दे. नाहीतर मी तुझ्या नवर्‍याला आणि मुलाबाळांना सोडणार नाही. त्यांना खल्लास करून टाकेल, अशी धमकी सलमान याने दिली. दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी विवाहिता घरात एकट्याच असताना आरोपी तिथे आला. त्याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. विवाहितेने आपल्याशी लग्न करावे यासाठी आरोपी सलमान हा फिर्यादी यांना एका वकीलाकडे घेऊन गेला. ‘आपला नवरा मारहाण करतो, पैसे मागतो’, असे वकीलांना स्वतःच्या हस्तक्षरात स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्यास आरोपीने भाग पाडले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.