Dapodi Crime news: पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

ही बातमी शेअर करा.

Dapodi Crime news: पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार
Pckhabar-भांडणे मिटविण्यासाठी बोलावून घेत तरूणाचा पाठलाग करून चौघांनी त्याच्यावर कोयत्याने वार करत बांबुने मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटून नेले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
विक्रम ऊर्फ विकी महेंद्र यादव (वय-25), प्रितम ऊर्फ पित्तु यादव (वय-24, दोघे रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर साहील काची उर्फ वाल्मिकी याच्यासह आणखी एका अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नईम सलिम शेख (वय-26, रा. पवार वस्ती, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. आरोपी हे  फिर्यादीच्या घराजवळ येऊन  भांडणे मिटवून घेऊ, असे म्हटले. मात्र, आरोपीजवळ कोयता, बांबु पाहून नईम पोलीस चौकीकडे पळून जात होता. दापोडीतील विनीयार्ड चर्चसमोर फिर्यादीला पाठलाग करून गाठले. आरोपी साहिलने त्याच्या उजव्या हातावर, पोटरीवर कोयत्याने वार केले. इतर आरोपींनी बांबुने मारहाण करून 500 रूपयांची नोट बळजबरीने काढून घेतली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.