Chakan Crime news: मैत्रिणीशी सेटींग लावून दे म्हणत महिलेचा विनयभंग; सुरक्षा अधिकारी गजाआड

ही बातमी शेअर करा.

Chakan Crime news: मैत्रिणीशी सेटींग लावून दे म्हणत महिलेचा विनयभंग; सुरक्षा अधिकारी गजाआड
Pckhabar- प्रेमाला वयाची मर्यादा नसते, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात चालतय असे म्हणून कंपनीत काम करणार्‍या महिलेला मैत्रिणीशी सेटींग लावून देण्याची मागणी विनयभंग केला. याप्रकरणी कंपनीच्या सुरक्षा अधिकार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार नाणेकरवाडी येथील एका कंपनीत घडला.

अभिजीत अशोक नाकिल (रा. नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी चाकण, नाणेकरवाडी येथील एका कंपनीत कामाला आहेत. आरोपी हा सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादी यांना प्रेमाला वयाची मर्यादा नसते, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात चालतय असे म्हटले.  मैत्रिणीशी सेटींग लावून देण्याची मागणी करत विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फौजदार साळुखे तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.