Dighi news: दिघीत साध्या पध्दतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा
Pckhabar-दिघीतील, दत्तनगर श्री दत्त मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमात होत आहेत.
सकाळी सकाळी 6 ते 7 श्रींची पुजा, आरती, 7 ते 10 ते श्री गुरूचरित्र पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, श्रींची आरती आदी कार्यक्रम होत आहे. मंगळवारी दत्त जयंतीदिवशी श्रींचा अभिषेक, होमहवन, गुरूचरित्र पारायण, आरती, प्रसाद तर सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. तर ज्ञानेश्वर वाळके यांच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव दत्ता घुले यांनी दिली.
Dighi news: दिघीत साध्या पध्दतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा















Leave a Reply