Sangvi crime news : सराफी पेढीतून 70 हजारांच्या सोन्याच्या चमक्यांची चोरी
Pckhabar- खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी सराफी पेढीतून 70 हजार रूपयांच्या 45 चमक्या नजर चुकवून चोरून नेल्या. ही घटना पिंपळे गुरव येथील चैतन्य ज्वेलर्स येथे घडली.
नारायणलाल राजरामजी माली (वय-49, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे पिंपळेगुरवमधील काटेपुरम चौकात चैतन्य ज्वेलर्स नावाने दुकान आहे. आरोपी महिला खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. फिर्यादी यांची नजर चुकवून 16 ग्रॅम वजनाच्या 70 हजार रूपये किंमतीच्या 45 सोन्याच्या चमक्या चोरून नेल्या. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
Sangvi crime news : सराफी पेढीतून 70 हजारांच्या सोन्याच्या चमक्यांची चोरी












Leave a Reply