Wakad crime news : पैसे मागितल्यास आत्महत्या करण्याची महिलेची धमकी

Wakad crime news : पैसे मागितल्यास आत्महत्या करण्याची महिलेची धमकी
  भागीदारीच्या व्यवसायातून महिलेची 20 लाखांची फसवणूक
Pckhabar- भागीदारीत सुरू केलेल्या ऑनलाईन व्यवसायातून एका महिलेची 20 लाख 81 हजारांची तिघांनी फसवणूक केली आहे. हा फसवणुकीचा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला आहे.
याप्रकरणी निहारिका मनिष प्रसाद (वय-39, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुष्कर मिश्रा, शिल्पा मिश्रा, सुरज सोमवंशीरा (तिघे रा. प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांनी भागीदारीमध्ये ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी निहारिका यांच्याकडून वेळोवेळी 29 लाख 11 हजार 252 रूपये आरोपींनी घेतले. त्यातील 11 लाख  परत केले. व्यवसाय बंद करण्याचे सांगून व्यवसाय सुरू ठेवला. त्यामध्ये होत असलेला नफा आणि नऊ महिन्याचा पगार न देता आरोपींनी त्यांची 20 लाख 81 हजार 252 रूपयांची फसवणूक केली. पैसे मागितल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकी दिली. तसेच आरोपी शिल्पा मिश्रा हिने त्यांना फोन करून माझ्यावर डिप्रेशनचे उपचार सुरू असून मला पैसे मागू नका, अन्यथा मी आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन, अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *