मनोरूग्ण महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Pckhabar- मनोरूग्ण महिलेला मारून टाकण्याची धमकी देत बलात्कार करणार्या सुरक्षा रक्षकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला.
किशोर दिनकर सुर्यवंशी (वय-30, रा. थेरगाव) असे अटक केलल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत महिला ही मनोरूग्ण आहे. महिलेचे पती व आरोपी एकाच ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. पिडितेचा पती झोपल्यानंतर आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसून मारून टाकण्याची धमकी देत बलात्कार केला. वाकड पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली. फौजदार गोडे तपास करत आहेत.
—————
मनोरूग्ण महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड















Leave a Reply