Pimpri crime news : आज तुझी विकेटच टाकतो, असे म्हणत तरूणावर कोयत्याने वार
Pckhabar- नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला शिवीगाळ करत जय व बबलु भाईला खुन्नस देतो काय आज तुझी विकेटच टाकतो, असे म्हणत कोयत्याने वार केले. ही घटना पिंपरीतील मटण मार्केंट जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मतिश अकबर कुरेशी (वय-24), ओमकार मारूती कामत (वय-18, रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. त्याचे साथीदार अनिश फिरोज शेख (वय-18), अमर सुरेश ओंबासे (वय-18), जय दिलीप बिरजे, बबलु दिलीप बिरजे (रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सनी सुरेश कदम (वय-24, रा. पिंपरी) हा जखमी झाला असून त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी हा पिंपरीतील मटण मार्केटजवळ नाष्टा करण्यासाठी थांबला होता. त्यावेळी आलेल्या आरोपी अमरने शिवीगाळ करत तु जय आणि बबलु भाईला खुन्नस देतो काय, आज तुझी विकेट टाकतो, असे म्हणत लोखंडी कोयत्याने पाठीवर वार केला. आरोपी ओंकारने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याने तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला. डाव्या कानावर मार लागला. तसेच जय आणि बबलु बिरजे यांच्या नादीला लागू, नकोस, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. फौजदार सोनवणे तपास करत आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply