Chinchwad crime news : पोलिसांच्या अंगावर धावून जाणार्या दोघांना अटक
Pckhabar-शासकीय कर्तव्य करणार्या पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाणार्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
अभिषेक राजू टेंकल (वय-18े), हरीष गणेश कांबळे (वय-18, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक नवनाथ नानाभाऊ बनकर (वय-35) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी सांगवीतील पीएन.जी. ज्वेलर्स समोर विना मास्क फिरणार्या, मोटर व्हेईकल अॅक्टप्रमाणे कारवाई करत होते. त्यावेळी मोपेडवरून आलेल्या आरोपींना पोलिसांनी अडवली. यामुळे चिडलेल्या आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply