काळेवाडीत महिलेचा खून
Pckhabar- कोणत्या तरी अवजड वस्तूने प्रहार करून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.
छाया गुंजाळ (वय ५५, रा.काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया या त्यांच्या घरात झोपल्या होत्या. पहाटे चारच्या सुमारास शेजाऱ्याने पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी छाया यांना आवाज दिला. छाया या जखमी अवस्थेत दिसून आल्या.
त्यांच्या डोळ्यावर कोणत्यातरी अवजड वस्तूने प्रहार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. छाया यांच्या घरात दोन सासू, पती, मुलगा, सून आणि सुनेच्या बाळंतपणासाठी आलेली तिची आई असे सर्वजण घरी होते. सुनेच्या आईलाही मारहाणीत दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा खून कोणी आणि कशासाठी केला हे समजू शकले नाही.

दरम्यान, घटनास्थळी जावून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहिती घेत पोलिसांना सुचना दिल्या.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply