Hinjewadi crime news : सराफाला बोलण्यात गुंतवून बंटी-बबलीने सोन्याची साखळी पळवली
Pckhabar- ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या बंटी-बबलीने दुकानदाराला बोलण्यात गुंतवले आणि दुकानातून 25 हजारांची सोन्याची साखळी चोरून नेली. ही घटना बावधन येथे घडली.
काळूराम जमालाल वर्मा (वय 41, रा. कृष्णशांती रेसिडेन्सी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एक महिला आणि एक पुरूषाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा यांचे हुतात्मा चौक बावधन येथे ज्वेलरी शॉप आहे. एक पुरूष व एक महिला त्यांच्या दुकानात आले. फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या दुकानातून 25 हजारांची साडेचार ग्राम वजनाची सोन्याची साखळी हातचलाखीने चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Hinjewadi crime news : सराफाला बोलण्यात गुंतवून बंटी-बबलीने सोन्याची साखळी पळवली















Leave a Reply