Sangvi crime news : अनोळखी पुरूषाशी मैत्री करणे महिलेला पडले महागात
Pckhabar- महिलेशी मैत्री करून तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. ते पैसे परत न करता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे उघडकीस आला.
ली वोंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री केली. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. महिलेने ते पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे न देता महिलेचा विश्वासघात व फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
Sangvi crime news : अनोळखी पुरूषाशी मैत्री करणे महिलेला पडले महागात















Leave a Reply