कवयित्री विमल जगन्नाथ ढालपे यांची कविता ‘आई’

                    ‘आई’

Pckhabar-
आई ही आईच असते
तिची जागा कोणा मिळत नसते
ती असते तेंव्हा ती कळत नसते
गेल्यावर मात्र कळल्याशिवाय राहत नसते |

देवाची पूजा करून आई मिळत नसते
परंतु आई ची पूजा करून देवाला मिळवता येते |

आई असते दिव्यातली वात
तिचं करते साऱ्या संकटावर मात |

आईच्या मायेला व्याजच नसते
निर्व्याज प्रेमाला मोजमापच नसते |

आई उसवलेला संसार सांधीत असते
लेकरांना मखमली कपड्यात ठेवीत असते |
आई जवळी भेदभावाचे मोजमापच नसते
आंधळ्या, मुक्या, बहिऱ्या रडक्या
साऱ्या वरती सावलीचा पदर धरत असते |

आई म्हणजे सारे विश्वच रे
ती आहे तर सारे जीवन चंदनच रे |

सौ.ढालपे विमल जगन्नाथ, ( निवृत्त उपशिक्षिका, कन्या विद्यालय पिंपरी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *