कोयत्याचा धाक दाखवून नोकराने लुटला सव्वादोन लाखांचा ऐवज 

कोयत्याचा धाक दाखवून नोकराने लुटला सव्वादोन लाखांचा ऐवज 

Pckhabar- महिलेला कोयत्याचा धाक दाखवून नोकराने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना  निगडी, यमुनागर येथील जीवनधारा हाऊसिंग सोसायटीमध्ये शनिवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.

स्मिता रमेश औताडे (वय 32, रा. जीवनधारा हाऊसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तनुसार किरण बोरा (वय 25) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बोरा हा फिर्यादी यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास किरण आणि त्याचे दोन साथीदार दुध देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्यादी स्मिता आणि त्यांच्या कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याने उलट्या बाजूने मारले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी घरातून एक लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 25 हजारांची रोकड, 20 हजारांची कारची चावी, 30 हजारांचे घड्याळ असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, आरोपी चोरी करून पळून जात असताना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. फौजदार ओहोळ तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *