दोंदे गावात घरोघरी सर्वेक्षण,  ३५०० गावकऱ्यांची केली तपासणी

दोंदे गावात घरोघरी सर्वेक्षण,  ३५०० गावकऱ्यांची केली तपासणी

Pckhabar- खेड तालुक्यातील दोंदे गावात दोन दिवसांत १७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात केले. 3500 गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली.

दोंदे गाव कंन्टेमेंट झोन घोषित करण्यात आले असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, गट विकास अधिकारी, अजय जोशी यांच्या सूचनेनुसार गावचे संपूर्ण विशेष सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासक महंकाळे, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी, आदर्श ग्रामसेवक निलेश पांडे आदीनी गावातील शिक्षक, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या सोबत गावातील तरुणांना स्वयंस्फूर्तीने या कामात मदत करण्याचे आवाहन केले. यानुसार विशेष सर्वेक्षण मोहिमेमध्ये गावातील भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, आशा वर्कर स्वयंसेवक यांच्या दहा टिम तयार करून प्रत्येक शिमला टेम्परेचर गण व पल्स ऑक्सिमिटर द्वारे गावातील ३५०० लोकसंख्येचे दोन दिवसांच्या सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण कलमुरगे, प्रशांत फुगे, प्रतिभा कार्ले यांनी नागरिकांचा प्लस रेट, ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली. लक्षणे असलेल्यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आली व पॉझिटीव्ह रुग्णांना तातडीने क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

कोरोना टिमच्या  कामाचे सभापती अंकुश राक्षे आणि गट विकास अधिकाऱ्यांनी  कौतुक केले. गावातील स्वयंसेवक म्हणून चंद्रकांत बारणे, सिद्धार्थ कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब कोहिणकर, सुधीरभाऊ बारणे, अध्यक्ष अनिल बारणे, हनुमंत अभंग, अतुल चौधरी, स्वप्नील म्हेत्रे, सचिन दरेकर, आकार कोहिणकर, विशाल बारणे, मुकुंद गरगोटे, निलेश बारणे, सचिन टाकळकर, अशोक सुकाळे, संतोष कोळी, दिलीप काळे, आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *