मोटारीसह चालक फरार

मोटारीसह चालक फरार
Pckhabar-गावी जातो, असे सांगून गेलेला चालक मोटारीसह फरार झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख महमद रफि (वय-30, रा. सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव अनिल गुप्ता (वय-22, रा. मारूंजी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या नावे असलेल्या (एमएच-14, एचडब्ल्यू 4948)  या मोटारीवर आरोपी चालक आहे. आरोपीने गावी जावून येतो, असे म्हणून मोटार घेऊन गेला. मात्र, गावी गेल्यानंतर तो मोबाईल फोन उचलत नसल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.  हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *