बलात्कार करून महिलेला दुचाकीवरून ढकलून दिले

बलात्कार करून महिलेला दुचाकीवरून ढकलून दिले
Pckhabar- पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार केला. तसेच दुचाकीवरून जात असताना तिला ढकलून देणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2018 पासून 29 जुलै 2020 या कालावधीत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडली.
याप्रकरणी 40 वर्षीय पीडित महिलेने सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिथून हा गुन्हा वर्ग करून पिंपरी-चिंचवड मधील निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी नागेश गुरुनाथ नंदरागे (रा. कलावती नगर, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश याने पीडित महिलेला गंगानगर -आकुर्डी, हिंजवडी, दहिटणे, अक्कलकोट रोड- सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात बलात्कार केला. दुचाकीवरून जात असताना नागेश याने पीडित महिलेला दुचाकीवरून धक्का देऊन खाली पाडले. यामध्ये महिलेच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला गंभीर दुखापत झाली.  निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *