रावेतमधून पावणे तीन किलो गांजा जप्त pckhabar-पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत मधून 2 किलो 723 ग्रॅम गांजा जप्त करत एकाला अटक केली आहे.
नितीन विश्वनाथ झेंडे (38, रा. ताथवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई धस यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी नितीन याला रावेत परिसरातून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 68 हजार 305 रुपयांचा 2 किलो 723 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.
रावेतमधून पावणे तीन किलो गांजा जप्त













Leave a Reply