बँकेतून बोलत असल्याचे सांगून एकाची सव्वा लाखांची फसवणूक
Pckhabar-आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे रीव्हर्ट झालेले पॉइंट परत मिळवून देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने एकाची एक लाख 33 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार न्युओलॉजी कंपनी, बाणेर येथे घडला आहे.
सुबोध प्रकाश कोठडिया (वय-49, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 6391270936 या मोबईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
A पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने 6391270936 या क्रमांकावरून कोठडिया यांना फोन केला. आपण आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट, पे बँक विभागातून मुंबई येथून बोलत असल्याचे आरोपीने कोठडिया यांना सांगितले. कोठडिया यांचा विश्वास संपादन करून तुमचे एक्सपायर झालेले क्रेडीट कार्डचे पॉइंट रीव्हर्ट करून देतो, असे आमिष दाखवले. कोठडिया यांच्या मोबईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडले. ओटीपी घेऊन आरोपीने कोठडिया यांच्या बँक खात्यातून एक लाख 33 हजार 200 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
बँकेतून बोलत असल्याचे सांगून एकाची सव्वा लाखांची फसवणूक













Leave a Reply