पिंपरीतील कन्या विद्यालयात ऑनलाईन शिक्षक दिन साजरा 

पिंपरीतील कन्या विद्यालयात ऑनलाईन शिक्षक दिन साजरा   

Pckhabar- शिक्षक दिनानिमित्त कन्या विद्यालय, पिंपरी वाघेरे येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कन्या विद्यालय, पिंपरी वाघेरे येथील इयत्ता 6 वी अ आणि ब या वर्गांनी ऑनलाईन शिक्षक दिनाचा कार्यक्रम सादर केला. कु. विशाखा राजेंद्र बावळे हिने सूत्रसंचालन केले. कु. सुप्रिया हत्ते, कु. श्रेया लोहार, कु. ऐश्वर्या अमृतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता 6 वी ब च्या वर्गशिक्षिका सौ. कांबळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता सहावीच्या विषय शिक्षिका सौ ऊनउने व सौ. फिसरेकर मॅडम उपस्थित होत्या.

मार्गदर्शिका मुख्याध्यापिका सौ शेटे मॅडम व पर्यवेक्षिका सौ. पाटील मॅडम यांचेही आभार मानले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन काकडे रोहिणी रत्नसिंह यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *