महिला पोलिसांवर दाजीने कु-हाडीने केले वार
Pckhabar- मोठ्या बहिणीच्या पतीने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कु-हाडीने तीन वार केले. ही घटना चिखलीतील कृष्णा नगर, रेल्वे पोलिस लाइन येथे आज घडली.
विनोद हिरामण चव्हाण (वय- ३५, रा. येलवाडी, देहूगांव) असे आरोपीचे नाव आहे. सिंधु मोहिते असे जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या रेल्वे पोलीसमध्ये नेमणुकीस आहेत.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिंधु यांच्या
मोठ्या बहिनीचा पती आहे. आरोपी त्यांच्या बहिणीला वारंवार मारहाण करीत होता. म्हणून त्यांनी मोठ्या बहिनीला माहेरी पाठविले होते. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने सिंधु यांच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिंधु यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.













Leave a Reply