पोलीस असल्याची बतावणी, घरात घुसून दागिने जबरदस्तीने नेले
Pckhabar- पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसून चार चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 1 लाखांचा ऐवज जबरदस्तीने नेले. तसेच घरातील टिव्हीवर कोयत्याने मारून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता चिंचवड येथे घडली.
सुंदर विलास ओव्हाळ (वय-48, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल कांबळे (वय-20) याच्यासह इतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओव्हाळ यांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या घरात शुक्रवारी पहाटे आरोपी आपल्या साथीदारासह घुसला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 1 लाख 2 हजार 200 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने नेला. जाताना घरातील 42 इंच टिव्हीवर कोयत्याने मारून नुकसान केले. फौजदार सोनवणे तपास करत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी, घरात घुसून दागिने जबरदस्तीने नेले













Leave a Reply