पिंपरीत सव्वा लाखांची घरफोडी

पिंपरीत सव्वा लाखांची घरफोडी
Pckhabar- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी  घड्याळ, रोकड असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपरीगावातील वैभवनगर येथे घडली.
आशिष शिवाजी चांदलेकर (वय-30, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चांदलेकर यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ, रोकड असा 1 लाख 23 हजार 260 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार सोनवणे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *