Bhosari Crime News : ऑरक्रिस्टामधील गायिकेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

Bhosari Crime News : ऑरक्रिस्टामधील गायिकेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

Pckhabar- ऑरक्रिस्टामध्ये गायिका म्हणून करण्यास घेऊन महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणार्‍या ऑरक्रिस्टा चालकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 पासून 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला.
बाळू शिवाजी गव्हाणे (वय-55, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. झिरो नंबरने हा गुन्हा हिंजवडी पोलीस  ठाण्यात वर्ग केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा ऑरक्रिस्टा आहे. त्याने फिर्यादी यांना ऑरक्रिस्टामध्ये गायिका म्हणून घेतले. त्यांच्याशी जवळीक वाढवून लग्नाचे अमिष दाखवत हिंजवडीतील लॉजवर घेऊन जात
जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. याचे फोटो आणि व्हिडीओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच वारंवार शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *