Alandi Crime News : ब्रोकरने घातला बिल्डरला सव्वाकोटींना गंडा
बनावट बँक खाते उघडून गृह कर्जाच्या पैशांची अफरातफर
Pckhabar-ब्रोकर आणि त्याच्या नातेवाईकांनी मिळून बिल्डरच्या नावे बँकेत बनावट खाते उघडले. फ्लॅट बुक करून कर्ज मंजूर करून ते या बनावट खात्यात घेतले. त्यांनतर ते पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरून बिल्डरची तब्बल 1 कोटी 26 लाख 13 हजारांची आर्थिक फसवणूक केली. चर्होली खुर्द येथे 21 जुलै 2017 पासून आतापर्यंत हा प्रकार घडला.
धनपाल अमृतलाल ओसवाल (वय 41, रा, भोसरी आळंदी रोड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हितेश छोटालाल सोळंकी (रा. भोसरी), अमित शेषमल जैन, राजेश भुरमल जैन, अबिद हाफिज खान, निझाम झहीरुद्दीन शेख आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पाच भागीदारांनी मिळून चर्होली खुर्द येथे 32 सदनिकांचा गृहप्रकल्प उभारला आहे. आरोपी सोळंकी हे ब्रोकर आहेत. त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीने गृहप्रकल्पातील सहा फ्लॅट बुक केले. त्यानंतर बिल्डरच्या नावे खोटे बँक खाते उघडले. त्यानंतर विविध बँकांकडून, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मंजूर करून ती रक्कम या बनावट खात्यात घेतली. या रकमेचा स्वत:च्या फायद्याकरिता वापर केला. तसेच फिर्यादी यांच्या भागीदारी कंपनीचे खोटे दस्त तयार तयार केले. फिर्यादी यांच्या वित्तीय संस्थेचे काही कामगार आणि अधिकार्यांना हाताशी धरून भागीदारी कंपनीच्या नावाने खोटे बँक खाते उघडले. त्यानंतर आळंदी येथील फिर्यादी यांच्या मार्व्हल कन्स्ट्रो या गृह प्रकल्पावर कर्ज काढून ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत.















Leave a Reply