Dehu News : मुलांना आहे तसे स्वीकारा; त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका

Dehu News : मुलांना आहे तसे स्वीकारा; त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका यजुर्वेंद्र महाजन यांचे सुजाण पालकत्वावर मार्गदर्शन, दीपस्तंभ फाऊंडेशनला ५१ हजारांची...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - PCKhabar.com Slot)
Dehu News : मुलांना आहे तसे स्वीकारा; त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका
Dehu News : मुलांना आहे तसे स्वीकारा; त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका यजुर्वेंद्र महाजन यांचे सुजाण पालकत्वावर मार्गदर्शन, दीपस्तंभ फाऊंडेशनला ५१ हजारांची देणगी Pckhabar- मुलांना आहे तसे स्वीकारून त्यांच्यावर नि:स्वार्थी प्रेम करा. त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना चांगला माणूस म्हणून घडवा. मुलांना मार्कांच्या पारड्यात तोलू नका, तर त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला प्राधान्य द्या, असा मोलाचा संदेश प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ यजुर्वेंद्र महाजन यांनी दिला. श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशन संचालित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित ‘सृजनदीप व्याख्यानमाले’च्या पहिल्या पुष्पात ते ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर बोलत होते. मुलांकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही; मात्र त्या वाजवी असाव्यात. मुलांवर अभ्यासाचे दडपण न टाकता त्यांना अभ्यासासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यावे. त्यांच्यातील गुण ओळखून त्यांचे कौतुक करावे. मुलांचा सर्वप्रथम भावनिक आणि मानसिक विकास झाला, तर ती आपोआप अभ्यास आणि करिअरकडे वळतात, असे महाजन यांनी सांगितले. आज पालकांना आपली मुले मोठी, श्रीमंत आणि यशस्वी व्हावीत असे वाटते; परंतु त्यापेक्षाही त्यांनी एक चांगला माणूस व्हावे आणि माणुसकी जपावी, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण आई-वडील का झालो आहोत, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. आपल्या पणजोबांची नावेही आपल्याला आठवत नाहीत; मात्र शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आजही समाजाच्या स्मरणात आहेत. माणसाच्या कार्याचे आणि विचारांचे महत्त्व यातून स्पष्ट होते. मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या; मात्र जे कराल ते सर्वोच्च दर्जाचे करा, असा प्रेरणादायी विचारही त्यांनी मांडला. ‘दीपस्तंभ’मधील मुलांच्या प्रेरणादायी जीवनकथा सांगत महाजन यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अत्यंत साध्या, सरळ आणि सहज शैलीत त्यांनी सुजाण पालकत्वाचे महत्त्व विशद केले. *सामाजिक बांधिलकी जोपासत  दीपस्तंभ फाऊंडेशनला रुपये ५१ हजारांची देणगी* अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दरवर्षी दिवाळी मेळ्याचे आयोजन केले जाते. या मेळ्यातून मिळणारा नफा सामाजिक कार्यासाठी एका संस्थेला देणगी स्वरूपात दिला जातो. यावर्षी दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते परंतू सामाजिक कृतज्ञता आणि दातृत्वाची भावना जपत सृजन फाऊंडेशनच्या वतीने दीपस्तंभ फाऊंडेशनला रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहालय संस्थेचे विश्वस्त किरीटी मोरे होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्राचार्य नाना शिवले, वाचनवेड संस्थेचे प्रमुख मयूरसेठ, वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिवाजीमहाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, शिक्षकवृंद आणि बहुसंख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा.विकास कंद यांनी केले. सहशिक्षिका सौ.तृप्ती हांडे यांनी ओघवत्या शैलीत महाजन सरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वृषाली आढाव यांनी केले, तर सौ.वंदना मारणे यांनी आभार मानले.
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • मुंबई

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या