Dehu News : देहू येथे विचारांचा दीप प्रज्वलित करणारी तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आजपासून

Dehu News : देहू येथे विचारांचा दीप प्रज्वलित करणारी तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आजपासून pckhabar-;देहू : सृजन फाउंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल...

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - PCKhabar.com Slot)
Dehu News : देहू येथे विचारांचा दीप प्रज्वलित करणारी तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आजपासून
Dehu News : देहू येथे विचारांचा दीप प्रज्वलित करणारी तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आजपासून pckhabar-;देहू : सृजन फाउंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर ते दि. 29 नोव्हेंबर 2027 या कालावधीत तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. विचारांची देवाणघेवाण, समाजप्रबोधन आणि शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना हा या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत नामवंत वक्ते, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचा प्रारंभ शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, लेखक व वक्ते श्री. यजुर्वेंद्र महाजन हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे विश्वस्त श्री. किरटी मोरे भूषविणार आहेत. यावेळी देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. चेतन कोंडे, पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्राचार्य श्री. नाना शिवले आणि वाचनवेड संस्था, पुणेचे श्री. मयूर सेठ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी ‘आपण मुले घडवूया’ या विषयातून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य व लेखक श्री. दत्तात्रय अत्रे असतील. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. जालिंदर महाराज मोरे, वृक्षदाई प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज मोरे आणि उद्योजक श्री. शशिकांत काटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेचा समारोप ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय...’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने होणार आहे. सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या मा. देवयानी फुले या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. स्मिताताई चव्हाण असतील. समाजसेविका डॉ. शिल्पाताई मापुस्कर, संत तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या कांबळे आणि देहूच्या माजी नगराध्यक्षा सौ. पुजाताई दिवटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीक्षेत्र देहू येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. ‘सृजनदीप व्याख्यानमाला’च्या माध्यमातून समाजातील विविध ज्वलंत विषयांवर वैचारिक मंथन घडवून आणण्याचा आणि समाजाला सकारात्मक विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेस देहू व परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि विचारप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद, तसेच शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले आहे.
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • मुंबई

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार