Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न
Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू येथे इयत्ता चौथी ते आठवीच्या ...
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - PCKhabar.com Slot)
(Ad ID: 7892341209 - PCKhabar.com Slot)
Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न
Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू येथे इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कला व हस्तकला विषयाच्या शिक्षिका सौ. माधुरी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि कल्पकतेचा वापर करून सुंदर व वैविध्यपूर्ण आकाशकंदील तयार केले. स्वतःच्या हातांनी आकाशकंदील तयार करताना विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, कलात्मकता आणि कल्पनाशक्तीचा सुरेख आविष्कार घडविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कागदकाम व हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच स्वनिर्मितीचा आनंद अनुभवता आला. तसेच दिवाळीच्या सणाचे सांस्कृतिक महत्त्व जाणून घेत पर्यावरणपूरक सजावटीची प्रेरणाही मिळाली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी आणि सर्जनशील विचारशक्ती विकसित होण्यास मदत होते. या भावनेतून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असे शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी यांनी सांगितले. इयत्ता चौथी ते आठवी च्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.