पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ‘धारावी पॅटर्न’ राबवून कोरोना महामारी आटोक्यात आणावी अशी मागणी भाजपा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे. यासंदर्भात उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय महापालिका ...