Dehu news : दोन एकरात ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न Pckhabar- देहूगावातील प्रगतशील शेतकरी गोविंदराव बाळू हगवणे यांनी दोन एकर शेतीमध्ये सुमारे ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. यामुळे हगवणे यांचे परिसरात कौतुक होत आहे. दिवसेंदिवस हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे शेतीत उत्पन्न कमी होते चालले आहे. सोबतच शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नसताना आणि मिळाले तरी मजुरी दर दिवसेंदिवस ...

Dehu Corona news: देहूगाव परिसरात 28 सक्रीय रूग्ण Pckhabar-देहूगाव परिसरात कोरोनाचे 28 रूग्ण सक्रीय आहेत. आज सात रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाही नवीन रूग्णांची नोंद झाली नाही, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली. देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 1 हजार 257 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 हजार 209 जण ...

Maval news: मावळातील आठ शाळांना पुस्तक संच वाटप Pckhabar- मावळ तालुक्यातील वारू केंद्रातील आठ शाळांना पुण्यातील ’वाचनवेड संस्थेच्या वतीने आणि देहूतील अभंग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रेरणादायी पुस्तकाचा संच वाटप करण्यात आला. मावळातील कोथुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे पोलिस अधिकारी गणेश टिळेकर, विस्ताराधिकारी रामराव जगदाळे, शिवाजीराव ढोल, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश ...

Dehu News:  50 भाविकांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराज बीजसोहळा Pckhabar- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या 50 निवडक भाविकांमध्ये संपन्न होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष-विश्वस्त यांच्या उपस्थितीत मुख्य मंदिरात उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी आढावा बैठक घेतली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा 30 मार्च रोजी होणार आहे. बीज ...

Dehugaon News: कोरोना लसीकरणाला प्रतिसाद, आजपर्यंत 324 जणांनी घेतली लस   लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (पीएचसी) बुधवार (दि.10) पासून ‘कोविशिल्ड’ कोरोना लसीचे डोस देण्यास सुरवात करण्यात आली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसात 324 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव ...

Dehu News: ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुजा बुधावले यांना रसिकाताई काळोखे यांच्याकडून अर्थसहाय्य Pckhabar- हिमाचल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड इंडियन ट्रेल्सतर्फे ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देहूतील पुजा बुधावले यांना महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा रसिकाताई स्वप्निल काळोखे यांनी आर्थिक सहकार्य केले. हिमाचल येथे 11 एप्रिल रोजी ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ ही स्पर्धा होणार ...

Dehu news: वीज कनेक्शन तोडल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण जिवे मारण्याची धमकी, तिघांना अटक Pckhabar- व्यावसायिक वीजबिल थकीत असल्याने वीज कनेक्शन तोडल्यामुळे तिन भावांनी महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार देहूगाव येथे गुरूवारी सकाळी घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. दिपक पांडुरंग चव्हाण (वय-36), निखील पांडुरंग चव्हाण (वय-28), विक्रम ...

  Dehu News: प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर Pckhabar-प्रगतशील शेतकरी आणि अभिनव फार्मर्सचे ज्ञानेश्वर बोडके यांना कर्तव्य फाऊंडेशनतर्फे ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार येत्या रविवारी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. देहूगाव येथील परंडवाल चौकातील संतकृपा लाॅन्स येथे रविवार दि.१४ मार्च २०२१ रोजी सायं.४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्ञानेश्वर बोडके यांची ४०० कोटींची उलाढाल ...

Dehu News: देहूगाव परिसरात धोका वाढतोय, 40 सक्रिय कोरोना रुग्ण ! Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. देहूगाव परिसरात 40 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली. देहूगाव परिसरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. विना मास्क फिरत आहेत, सुरक्षित अंतराचे ...

Dehu News: देहूकरांनो गाफील राहू नका… कोरोना रूग्ण संख्या वाढतेय Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दोन दिवसात नऊ कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली. देहूगाव परिसरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत आहेत, सुरक्षित अंतराचे पालन करत नाहीत, यासह नागरिक शासनाने दिलेले ...