Maval news: तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करा : खासदार बारणे यांची मागणी Pckhabar-मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी. त्याचे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आज (बुधवारी) दिल्लीत बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे, ...

Maval news: कोरोना प्रतिबंधासाठी मावळात शनिवारी व रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लावा मावळ तालुका शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी Pckhabar- गेल्या 15 दिवसांपासून मावळ तालुक्यातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यात शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू  लावावा, अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात ...

Maval News: पवना हॉस्पिटलमधील लाचखोर डॉक्टरला अटक Pckhabar-शासकीय योजनेंतर्गत मोफत डायलिसिस उपचार सुरू असलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून 9 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी पवना हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. त्याच्यासह एका साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय 58), हॉस्पिटलमधील खाजगी मार्केटिंग ऑफिसर प्रमोद वसंत निकम (वय 45) अशी अटक केलेल्या ...

Talegaon Dabhade news: कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमा : विरोधी पक्षनेते गणेश काकडे Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरीत करावी, अशी मागणी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्याकडे केली आहे. काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन सुमारे तीन महिने झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदावर ...

Talegaon Dabhade News: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती गठीत करा – गणेश काकडे Pckhabar-तळेगाव दाभाडे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानाबाबत विविध नियोजन करणे, निर्णय घेणे, आढावा घेणे यासाठी नगरपरिषद सदस्यांची ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती’ तत्काळ गठीत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना दिलेल्या ...

Talegaon Dabhade news: स्वीकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे, समीर खांडगे Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे संतोष हरिभाऊ दाभाडे तर जनसेवा विकास समितीचे समीर हरिश्चंद्र खांडगे यांची आज गुरुवारी निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम पहिले. त्यांना सहाय्यक म्हणून उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सहकार्य केले. नगरसेवकपदी निवड झालेले ...

Talegaon Dabhade news: ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा त्वरीत सुरु करा : आमदार सुुुनिल शेेेेळकेे Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी नगरपरिषदेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा सुरु करावी, या मागणीचे निवेदन नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना आमदार सुनिल शेळके यांच्या प्रतिनिधींनी दिले. निवेदन आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने प्रतिनिधी गोकुळ किरवे, नबीलाल आत्तार, योगेश मोरे यांनी तळेगाव नगर परिषदेच्या ...

Talegaon Dabhade news:  मायमर मेडिकल कॉलेजमध्ये लसीकरण सुविधा केंद्राचे उद्घाटन, जेष्ठ नागरिकांना २०० रूपयांमध्ये लस Pckhabar-“ कोविडच्या काळात डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रूग्णालयाने केलेले कार्य हे खरच कौतुकास्पद आहे. त्यातच आता येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरणचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.” असे आवाहन मावळचे गटविकास अधिकारी  भागवत यांनी केले. एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय येथे नागरिकांसाठी ...

Talegaon Dabhade news: सिध्दीविनायक नेस्टमध्ये महिला दिन उत्साहात साजरा Pckhabar- सिद्धिविनायक नेस्ट गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. मोहननगर येथील सिध्दीविनायक नेस्ट सोसायटीमधील महिलांची इंद्रायणी ऑप्टिकलतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. महिलांनी रॅम्प वाॅक सादर केला. उखाणे घेतले. लहान मुलांनी ‘जागतिक महिला दिन’ या विषयावर ...

Maval news: शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान Pckhabar-मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे,  संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला. अंगणवाडीसेविका, शिक्षक, शिक्षिका, कृषी खाते, सरकारी कार्यालयात काम करणा-या महिला आणि कोरोना काळात चांगले काम केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचीत ग्रामपंचायत  सरपंच, सदस्यांचाही वडगाव ...