Dehu News : इंद्रायणीनगर सांस्कृतिक मंडळाने साकारला चंद्रयान- 3 चा देखावा
Pckhabar- इंद्रायणीनगर मंडळ गणपती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करत आहे. मंडळाने यावर्षी आगळा- वेगळा देखावा साकारला आहे. चंद्रयान- 3 चा देखावा साजरा करून सर्वांची मने जिंकली आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संस्थेने चंद्रयान-3 ही तिसरी चंद्र शोध मोहीम यशस्वी केल्यानंतर भारताचा जगभरात नावलौकिक झाला आहे. भारताचे चांद्रयान यशस्वी रित्या चंद्रावर उतरल्याचा आनंद गणेशोत्सवात देखील दिसून येत आहे.
त्यामुळे या देखाव्यांचे सर्व स्तरातून या कौतुक होतं आहे. हा देखावा बनवताना विशेष म्हणजे लहान मुलांनी सहभाग दाखवला, त्यामुळे अजूनच कौतुक होतं आहे. तसेच मंडळाने विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
इंद्रायणीनगर नेहमी वेगवेगळे देखावे साजरे करत असतात आणि सर्व सर्वजनिक कार्यक्रम करत असतात. तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम आणि सामाजिक कार्य राबवत असतात. Social work करत असतात. त्यामुळे इंद्रायणीनगर मंडळ नेहमी चर्चेत राहिलेली आहे.










Leave a Reply