Dehu News : अभंग प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून देहू जिल्हा परिषद शाळेला सात लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य भेट
माजी विद्यार्थी महेश गाडे, अभंग प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सुरेश गाडे, नगरसेवक प्रवीण काळोखे यांचा पाठपुरावा
Pckhabar अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नो फोर्ज,मुंढवा,पुणे यांच्या सीएसआर फंडातून, या कंपनीचे प्लांट हेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,देहुचे माजी विद्यार्थी महेश लक्ष्मण गाडे यांच्या विशेष सहकार्याने व अभंग प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सुरेश लक्ष्मण गाडे व नगरसेवक प्रवीण रामदास काळोखे यांच्या पाठपुराव्यातून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला सात लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले आहे.

बुधवारी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीचे प्लांट हेड श्री. महेश गाडे, श्री विशाल सरोदे श्री.राहुल सावंत,श्री. मुरलीधरण पिल्ले, श्री सुशील पाटील श्री.पूर्णचंद्र अर्या, श्री.संतोष गडमोडे,श्री.स्वप्निल मझिरे, सौ.मोनिकाताई प्रवीण काळोखे,श्री.नवीन काळोखे, पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन परसराम काळोखे, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.वसंत परशुराम भसे, श्री.सुरेश गाडे, श्री.नारायण तथा तात्यासाहेब पाचपिंड,श्री.सचिनआप्पा काळोखे, श्री.विजय मोरे, श्री.अजिंक्य साकोरे, श्री.सचिन कुंभार,श्री. सुभाष कंद, श्री. बिभीषण खोसे श्री. प्रीतम कंद आदी मान्यवर पदाधिकारी, याशिवाय शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जठर सर, सर्व शिक्षक वृंद, अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी श्री.हगवणे सर, श्री.राहुल सावंत व श्री.महेश गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व शिक्षकांनी व पालक प्रतिनिधी यांनी कंपनीच्या या अनमोल सहकार्याबद्दल कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व एक चांगले माध्यम म्हणून अतिशय सेवाभावनेने कार्यरत असणाऱ्या, शाळेसाठी वेळोवेळी अनमोल सहकार्य करणाऱ्या अभंग प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले . आभार प्रदर्शन श्री. नरवडे सर यांनी केले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांसाठी बँचची व काही शैक्षणिक साधनांची आवश्यकता आहे हे अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महेश गाडे यांना सांगितले. त्यानंतर तात्काळ आपल्या कंपनीतील पदाधिकारी यांच्या समवेत महेश गाडे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून, शाळेची गरज लक्षात घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडातून १२० बँच, ४२ इंची ५ स्मार्ट टीव्ही असे सात लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेस भेट दिले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कल्याणी टेक्नो फोर्ज या कंपनीतील सर्व पदाधिकारी यांचे व विशेषत्वाने महेश गाडे यांचे विशेष आभार व्यक्त केले. आज जिल्हा परिषद शाळांमधून गोरगरीब, कष्टकरी वर्गातील पालकांची मुलं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांस सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ व्हावा हे लक्षात घेऊन आपण कार्य करीत आहात याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त करून कौतुक केले.











Leave a Reply