Dehu News : देहूगावातील संत जिजाबाई कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण

Dehu News : देहूगावातील संत जिजाबाई कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण

Pckhabar- देहूगावातील संत जिजाबाई कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात शनिवारी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन देहूगावचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल काळोखे आणि विद्यालयाचे थोर देणगीदार श्री. नारायण मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयामध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात यशवंत ठरणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी विविध नृत्याविष्कार सादर केले. अगदी पारंपरिक नृत्यपासून आराध्यगिते,लावणी, बालगीते, देशभक्तीपर गीते, पाश्चिमात्य नृत्यप्रकार इत्यादी सर्व प्रकारच्या कलाविष्कारांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि पालक वर्ग सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

मान्यवरांनी विद्यालयाचे आणि सर्व विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. तांबे सर आणि मुख्याध्यापिका सौ. वडाळकर मॅडम यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. वडाळकर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. आडकर मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *