Dehu News : दारुंब्रे केंद्रातील १३ जि. प. शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट
वाचनवेड संस्थेच्या विशेष सहकार्याने अभंग प्रतिष्ठान
Pckhabar- वाचनवेड संस्थेच्या विशेष सहकार्याने अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी मनात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अखंडपणे सुरू आहे.
आज मावळ तालुक्यातील दारुंब्रे केंद्रातील १३ जि. प. शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी आदरणीय श्री. सुदामजी वाळुंज सर यांची अनमोल उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी दारुंब्रे या केंद्रातील १३ जि.प.शाळेतील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे सदस्य नारायण पचपिंड, सचिन साळुंके, विक्रम भोईटे, दिनेश साळुंके, अजिंक्य साकोरे व विकास कंद उपस्थित होते.

आजपर्यंत दुर्गम, ग्रामीण भागातील ३०० पेक्षा अधिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन व वाचनाचे महत्त्व समजावून सांगून या पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. आपणही सर्वांनी अगदी आपल्या घरापासून ही वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहूया…वाचनातून सुंदर जीवन घडवूया.










Leave a Reply