Dehu News: अभंग प्रतिष्ठानचे आकर्षक बोधचिन्ह
सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश पाटील यांनी साकारले डिझाईन
Pckhabar – मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार, अभंगअक्षरे या पेजचे प्रवर्तक संत विचारांवर निष्ठा ठेवून कार्य करणारे व्यक्तिमत्व प्रकाश पाटील यांनी अभंग प्रतिष्ठानचे कार्य लक्षात घेऊन आज एकादशी व गीता जयंतीच्या मंगल दिनी अभंग प्रतिष्ठांनचा लोगो स्वतः डिझाईन करून भेट दिला आहे. प्रकाश पाटील यांचे अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आभार मानले.
आपल्यासारख्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वांच्या आशीर्वाद व सदिच्छा यांच्या पाठबळावर अभंग प्रतिष्ठानचे सेवाकार्य अखंडपणे सुरू आहे. आपले लाख मोलाचे आशीर्वाद सदिच्छा आम्हाला सदैव लाभाव्या हीच प्रेमळ अपेक्षाही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केली.
अभंग प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी २००४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अभंग प्रतिष्ठानचे बोधचिन्ह पिंपळपान असावे असे निश्चित झाले होते. करावे सायास आपुलिया हिताचे | येथे आल्याचे मनुष्यपण || हे संत तुकोबारायांचे अभंग वचन आपले बोधवाक्य म्हणून निश्चित केले होते. या बोधचिन्हामध्ये देखील अतिशय सुंदरपणे पिंपळपानात संत तुकाराम महाराजांचे प्रतिबिंब पाटील सरांनी चित्रित केलेले आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद अभंग प्रतिष्ठानसाठी सदैव लाख मोलाचे आहेत. आम्हांस नित्य प्रेरणादायी आहेत, अशा भावना अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.










Leave a Reply