Maharashtra News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडीसाठी आवाहन ; वंचित समूहातील भगिनींना देण्यात येणार माहेरची साडी

Maharashtra News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडीसाठी आवाहन ; वंचित समूहातील भगिनींना देण्यात येणार माहेरची साडी

Pckhabar- दिवाळीत भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील भगिनींना माहेरची साडी देण्यासाठी स्नेहालय परिवाराने दरवर्षी प्रमाणे यंदाही आवाहन केले आहे .

दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई देण्याची आपली परंपरा आहे.

ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी दिवाळीमधील भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशा माता – भगिनींसाठी मात्र दीपोत्सव दु:ख आणि निराशेने भरलेला असतो. अशा माता-भगिनींना माहेरची साडी भाऊबीजेनिमित्त देण्याचा उपक्रम अहमदनगर येथील *स्नेहालय* संस्थेच्या वतीने १५ वर्षांपूर्वी सुरू झाला.

सामाजिक कार्यकर्ते स्व. धर्मराज शंकर औटी गुरुजींची प्रेरणा आणि प्रयत्न यमागे होती. मागील वर्षी औटी गुरुजी यांचे निधन झाले. ते स्वतः गरीब ,कष्टकरी आणि वंचित समूहातील महिलांसाठी सहृदयी भाऊ शोधून एकेक नवीन साडी गोळा करीत. औटी गुरुजी यांचे निधन झाले असले तरी त्यांनी सुरू केलेली माहेरच्या साडीची परंपरा यापुढे कायम चालविण्याचा अभंग प्रतिष्ठान,देहू या सामाजिक संस्थेच्या संकल्प आहे .

मिळालेली माहेरची साडी ही महिलांसाठी केवळ नवे कापड नसते, तर ती जगण्याची उमेद आणि नवी आशा असते. ; वर्षी प्रमाणे या वर्षीदेखील या भाऊबीजेच्या उपक्रमात आपण सहभागी होऊन किमान एक माहेरची साडी आपल्या या भगिनिंसाठी द्याल असा आम्हास विश्वास आहे.

या उपक्रमात सहकार्य करण्यासाठी संपर्क :
१)श्रीकांत मोरे ९८६०१०४८८३,
२) सुजित मोरे ८७९६१११८१९,
३)विकास कंद ९८८११३५२५१,
४) सचिन कुंभार ९८८१६१९०८६,
५) सागर मोरे ९८२२२८६३५३,
६) नारायण पाचपिंड ९९२२४१५३५४,
७) निलेश मिरजकर ८६६९४१२११३,
८) सुरेश गाडे ९८८१५६७०७०
९) सचिन काळोखे ९८८११८३५५५
१०) अमित गायकवाड ७७२२०८३४११
११)अजिंक्य साकोरे ९८८१९६६५७९
१२)राकेश बुचुडे ९९२२२६४७११
१३) अतुल झेंडे ९९२११७४९१७
१४) प्रशांत (बाबू) काळोखे ९८८१५५६६६४
१५) सचिन लिंभोरे ९८२२४२७९२८
आपले नम्र,
*स्नेहालय परिवार अहमदनगर,*
*अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू…*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *